TOD Marathi

2022 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. खरं तर, गोव्यातील इफ्फी ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ कार्यक्रमात इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती, (Israeli filmmaker Nadav Lapid made a controversial comment about his film ‘The Kashmir Files’ at the Iffy ‘International Film Festival of India’ in Goa). त्यानंतर ‘द काश्मीर फाइल्स’ ट्विटर आणि सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला.

गोवा येथे पार पडलेल्या इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ज्युरी हेड व इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका केली. लॅपिड यांनी हा चित्रपट ‘व्हल्गर’ व ‘प्रोपगंडा’ (‘Vulgar’ and ‘Propaganda’) असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार यावर भाष्य करत आहेत.

IFFI मधील इतर ज्युरींनी लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेल्या टीकेवर त्यांचं मत व्यक्त मांडलं आहे. लॅपिड यांनी चित्रपटाबद्दल केलेलं भाष्य हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच कोणीही राजकीय टिप्पणी केली नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.


‘द कश्मीर फाइल्स’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाशी संबंधित काही छायाचित्रे शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर यांनी लिहिलं ‘झूट का क़द कितना भी ऊँचा क्यों ना हो.. सत्य के मुक़ाबले में हमेशा छोटा ही होता है’.. त्याचबरोबर अलीकडेच अनुपम खेर यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ बद्दल बोलताना सांगितले की, 1990 च्या दशकात काश्मिरी पंडित समुदायावर झालेल्या शोकांतिकेने जगभरातील लोकांना जाणीव करून दिली होती.

अनुपम खेर यांच्यासह निर्माते अशोक पंडीत यांनीही याबाबत भाष्य करत ट्विट केलं आहे. ‘माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नदल लॅपिड यांची इफ्फीच्या मुख्य ज्युरीच्या पदावर बसवणं हीच मोठी चूक होती. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे’, असं त्यांनी म्हटलं आहे.