टिओडी मराठी, दि. 2 जून 2021 – महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर आणखी ताण आला आहे. यातच राज्यात 0 हजार क्षयरुग्णांची नोंद झाली असल्याचे आढळले आहे. यासाठी आरोग्य सेवा संचालनालयातर्फे विशेष प्रयत्न सुरू केले आहेत, असे समजत आहे.
कोविडपूर्व काळात महाराष्ट्र राज्यात दर महिन्याला सरासरी 19 हजार क्षयरुग्णांची नोंद होत असे, ती कमी होऊन एप्रिल 2021 मध्ये 10,036 रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य सेवा संचालनालयाच्या डॉ. अर्चना पाटील यांनी दिली आहे.
डिसेंबर 2020 मध्ये राबविण्यात आलेल्या एसीएफ अभियानांतर्गत 8 कोटींहून अधिक व्यक्तींची तपासणी केली आहे. 3.33 लाख संभाव्य क्षयरुग्ण निश्चित केले असून जानेवारी 2021 पर्यंत 12,823 क्षयरुग्णांचे निदान झाले आहे.