नेहमीच आपल्या विविध राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar comments over Supriya Sule) पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहे. विरोधकांवर टीका करतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील 24 तासांत अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाई, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
औरंगाबादच्या सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde to address public meeting in Sillod) यांची जाहीर सभा आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान याचवेळी बोलतांना विरोधकांवर अब्दुल सत्तार यांनी टीका केली. आमच्यावर खोके घेण्याचे आरोप करणारे लोकं भिकार** असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नव्हे तर दोनदा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी होत आहे.
यावर विविध पक्षाच्या महिल्या नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने महिलाबद्दल आदरयुक्तपणे टीका केली पाहिजे पाहिजे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. अब्दुल सत्तार यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे चुकीचं असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. (Deepali Sayed on statement of Abdul Sattar) तर अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द माघे घेऊन माफी मागितली पाहिजे असेही दिपाली सय्यद म्हणाल्या आहे. यावर बोलतांना भाजपच्या महीला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अब्दुल सत्तारच नाही तर कोणत्याही नेत्याने अशाप्रकारे वक्तव्य करू नयेत असे चित्र वाघ म्हणाल्या. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काही ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत.