टिओडी मराठी, दि. 15 ऑगस्ट 2021 – आज सकाळी लेबनॉनच्या उत्तर भागामध्ये इंधनाने भरलेल्या एका टँकरचा स्फोट झाला असून या स्फोटात 20 जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत, तर 79 जण जखमी झालेत. यातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालायत दाखल केलं आहे.
लेबनॉनचे आरोग्य मंत्री हमद हसन यांनी दिलेली माहिती अशी, सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या उपचारावरील सर्व खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे.
लेबनॉनमध्ये अगोदर इंधनाचा तुटवडा आहे. त्यात स्फोट झाल्याने देशाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा या ठिकाणी 200 जण उपस्थित होते. अजूनही घटनास्थळी तपास सुरू आहे.
स्फोटांमध्ये जखमी झालेल्या अनेक नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच अद्याप या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेलं नाही.
#Akkar #Lebanon The explosion that took place last night in the town of Al-Talil in #Akkar killed at least 50 people. The failure of the Lebanese government has been a disaster for the lives of the Lebanese people costing them many lives, first the #BeirutBlast and now #Akkar! https://t.co/DWToySBRkI
— Ibrahim Bin Mas'ud – إبراهيم بن مسعود (@ibrahimbinmasud) August 15, 2021
https://twitter.com/linzagain/status/1426800957225115648?s=20
At least eight people have been killed and up to 100 others injured when a gas tanker exploded in the Tleil area of #Lebanon’s Akkar district, according to media reports.https://t.co/7ykoxCUopI pic.twitter.com/l1AfnhTeux
— Al Arabiya English (@AlArabiya_Eng) August 15, 2021