मुंबई: विधानसभा अध्यक्षपदासाठी शुक्रवारी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली तर आज महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणी राजन (Rajan Salvi) साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Speaker) अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी लढत होईल (Rahul Narvekar BJP vs Rajan Salvi MVA). आज साळवी यांच अर्ज दाखल करताना बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू आदी मंडळी उपस्थित होती.
कोण आहेत राजन साळवी ?
साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार असून शिवसेनेचे उपनेतेही आहेत. 2009 पासून सलग तीनदा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय.
कोण आहेत राहुल नार्वेकर ? नार्वेकर यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. जवळपास तीन वर्ष ते राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य होते. 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे 2019 मध्ये कुलाबा मतदारसंघातून ते आमदार झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांचे (Ramraje Naik Nimbalkar) ते जावई आहेत.
शिंदे सरकारची बहुमत चाचणी येत्या दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.