TOD Marathi

राज्यात २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना केले. (Devendra Fadnavis appeals to BJP mlas) राज्यात आपलं सरकार आलं असून कुणीही नाराज होऊ नका, सर्वांची कामे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते.

मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये (Meeting of bjp mla at hotel Trident Mumbai) झालेल्या आमदारांच्या बैठकीत फडणवीसांनी हे आदेश दिले. पुढच्या अडीच वर्षांत रखडलेली सर्व कामे मार्गी लावूया. कोणीही कसलीही काळजी करू नका आणि आता सर्वांनी जनतेच्या कामासाठी लागा, असेही ते म्हणाले. राज्यात आपले सरकार असले तरी अडीच वर्षांनी येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची आतापासून तयारी सुरू करा आणि या निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळवून देण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावा, (Get ready for 2024 state assembly election from now, says Devendra Fadnavis to bjp mla) अशी सूचना त्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते.