शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Sanjay Raut met Sharad Pawar) या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना थेट इशारा दिला आहे आम्ही आमचं बहुमत सभागृहातही सिद्ध करू आणि रस्त्यावरची लढाई देखील जिंकू, असा आत्मविश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. (We will win every battle, says Sanjay Raut) यासोबतच सरकारने यशस्वीरीत्या अडीच वर्ष पूर्ण केले आणि पुढची अडीच वर्षही सरकार निश्चितपणे पूर्ण करेल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पूर्णपणे स्थिर आहे. बंडखोरांना दिलेली मुदत संपल्याचे सूतोवाचही संजय राऊत यांनी यावेळी केले. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेत बंडखोर लोकांना परत येण्याचे आवाहन केले होते. 24 तासात मुंबईत परत या, आपण बसून बोलूया सर्वांची इच्छा असेल तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबतही विचार करूया असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र असे असतानाही एकनाथ शिंदे यांच्या बंडाची धार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलय.