TOD Marathi

मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही. वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. मला आरोप प्रत्यारोपांचा खरं तर वीट आलाय पण हीच वीट आता डोक्यात हाणणार अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray attacked the rebel Eknath Shinde maharashtra politics)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही..वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.

स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. संजय राठोडांवर वाईट आरोप झाले तर त्यांना सांभाळून घेतलं. बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्यात काम सुरू आहे.

माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा, तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालंय. तिकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही. असं आव्हानच त्यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.

एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, त्यांचा मुलगा शिवसेनेकडून खासदार आहे. शिंदेंसाठी मी काय कमी केलं? असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

अशा प्रकारे विविध मुद्यांना धरून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना जोरदार आव्हान दिलं.

उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील प्रमुख मुद्दे;

● भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव

● वर्षा की मातोश्री? झोपेतही सांगेन मातोश्री.

● वर्षा सोडलं म्हणजे जिद्द सोडली असं नाही

● जे गेले ते माझे कधीच नव्हते.

● मी शांत आहे षंढ नाही.

● कधी राणेंना अंगावर सोडा कधी तोतऱ्याला सोडा.

● आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वतःचा पोरगा खासदार.

● या सगळ्याचा वीट आलाय. पण हीच वीट डोक्यात घालणार.