बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुखचं ((Genelia Deshmukh) तेलुगू चित्रपटांशी फारच खास नातं आहे.
कारण अभिनेत्रीने हिंदीपेक्षा जास्त साऊथ चित्रपटांमध्ये काम केलंआहे. ही अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीत पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. जेनेलिया कन्नड-तेलुगू अशा द्विभाषिक चित्रपटाद्वारे पडद्यावर कमबॅक करणार आहे. ही आनंदाची बातमी नुकतंच जेनेलियाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनेलिया डिसूझा-देशमुखला तिच्या आगामी चित्रपटात एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे.
जेनेलियासोबत कर्नाटकचे माजी मंत्री गली जनार्दन रेड्डी (Janardhan Reddy) यांचा मुलगा किरेटी रेड्डी (Kireti Reddy) देखील या चित्रपटातून पडद्यावर पदार्पण करणार आहे. नुकतंच या चित्रपटातील जेनेलियाची भूमिका समोर आली आहे.
तसेच, रिपोर्ट्सनुसार, निर्माते लवकरच अभिनेत्रीच्या भूमिकेबद्दल अधिकृत अपडेट देणार आहेत. किरेटी तिच्या पहिल्या तेलुगू चित्रपटात पेल्ली सांडा फेम अभिनेत्री श्री लीलासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
हा एक अॅक्शनवर आधारित रोमँटिक ड्रामा असणार आहे.यामध्ये ज्येष्ठ कन्नड अभिनेते रविचंद्र यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. राधा कृष्ण हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
10 वर्षांनंतर जेनेलिया साऊथमध्ये पुनरागमन करणार आहे. नुकतंच या चित्रपटाची घोषणा स्वतः जेनेलियाने केली आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली, ‘मी अभिनयापासून 10 वर्षे दूर आहे. शेवटी, मी या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे आणि हा एक अतिशय खास प्रोजेक्ट आहे. किरेटीला तिच्या पदार्पणासाठी शुभेच्छा. ती पुढे म्हणाली की, ‘या चित्रपटात उत्तम निर्माता आणि उत्तम कलाकार आहेत. मी एक न्यूकमर आहे आणि अनेक वर्षांनंतर सेटवर परत येत आहे. तसेच आता मी या तरुण टीमचा एक भाग आहे.