माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेत(series) यश आणि नेहा यांच्यातील रेशीमगाठ आता कुठे जुळत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतानाच दोघांच्या प्रेमाला आता ग्रहण लागणार आहे. त्यांच्या विवाह विशेष भागात दाखवल्याप्रमाणे प्रेक्षक उत्सुक होते ते म्हणजे या भागात दाखवण्यात आलेल्या नव्या पात्रामुळे. हे पात्र कोण आहे? कोण साकारणार आहे? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते. आता या सर्व प्रश्नांचा उलगडा झाला आहे. हे पात्र काय आहे आणि ते कोण साकारणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. मालिकेचा(series) एक प्रोमो सध्या प्रदर्शित झाला असून ज्यात अविनाशची म्हणजेच नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री दाखवण्यात आली आहे. खरंतर नेहाच्या लग्नातच अविनाश तिच्या घरी गेल्याच पाहायला मिळालं होते. मात्र त्याचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता.
अखेर नेहाच्या पहिल्या नवऱ्याचा अविनाशचा चेहरा सर्वांसमोर आला आहे. नेहा आणि परी यशबरोबर पॅलेसमध्ये राहायला आलेत. दोघींचं आयुष्य सुरक्षित झालेलं असताना नेहा आणि परीच्या आयुष्यात अविनाश नावाचं वादळ येणार आहे. नेहाचा पहिला नवरा अविनाश दोघींच्या आयुष्यात नवं वादळ घेऊन येणार आहे.
अविनाशच्या येण्यानं नेहा आणि यश यांच्या प्रेमाला तडा जाणार आहे.
View this post on Instagram
नेहाचा पहिला नवरा म्हणजे अविनाथ ही भूमिका निखिल राजेशिर्के (Nikhil Rajeshirke) साकारत आहे. ‘रंग माझा वेगळा’ मधून आलेला हा चेहरा आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये देखील दिसणार आहे. ‘रंग माझा वेगळा’मध्ये त्याने सुजय दाते ही भूमिका साकारली होती. निखिलने अनेक मालिका, नाटकांमध्ये दमदार अभिनय केला आहे. तो लवकरच ७ दोन ७५ या सिनेमात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. लगोरी, अजूनही बरसात आहे, छोटी माककीण या मालिकांमध्ये देखील त्याने भूमिका साकारली होती. ‘मुव्हींग आउट’ या वेब सीरिजमध्ये निखिलने अभिज्ञा भावेसह स्क्रीन शेअर केली होती.