नागपूर : राज्यात पाणी प्रश्नावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Ledear Devendra Fadanvis ) यांनी राज्यात पाणी प्रश्नांवर जलआक्रोश मोर्चा (Jalakrosh Morcha ) राज्यभरात सुरु केलाय.मात्र आता फडणवीसांच्याच नागपुरातील पाणीपुरवठ्याची व टंचाईची स्थिती समेोर आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी ( Central Minister Nitin Gadakari ) यांनीच याबाबत वक्तव्य करत फडणवीसांना घरचा आहेर दिला आहे.
नागपुरच्या ( Nagpur) पाणी प्रश्नाच्या आढावा बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले की, पेंच आणि कन्हान ( Pench & Kanhnah River ) नदीमधून पुरेसा पाणीपुरवठा होऊनही मागील दहा वर्षांपासून नागपूरला पाणी समस्येला सामोरं जावं लागत आहे. वितरणाचं कामही असमाधानकारक आहे.
तसेच अनेक ठिकाणी जलवाहिन्यांची कामे अपूर्ण आहेत. एकाही भागात २४ तास पाणी मिळत नाही, असंही म्हणत गडकरींनी खंत व्यक्त केली आहे. पाणी प्रश्नांवर जलआक्रोश करणारे भाजप नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील पाणीपुरवठ्याची व टंचाईची स्थिती यातून स्पष्ट होते.