विधानपरिषद बिनविरोध निवडणूक (Vidhan Parishad Election) करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आला तर प्रयत्न करणार आहोत, राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election ) आलेला अनुभव पाहता महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) योग्य निर्णय घेईलच, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी दिली आहे. कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटलांकडून महाविकास आघाडीला देण्यात आलेला हा दुसरा चर्चेचा प्रस्ताव आहे.
यावेळेस बोलताना पाटील म्हणाले की, माझा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanivs) यांचा फोन कायम सुरू आहे. माणसाने कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता काम करत राहिलं पाहिजे.
गेल्या काही दिवसांमध्ये तपास करणाऱ्या यंत्रणांवर दबाव आणायचं काम सुरू झालं आहे. कारवाई केली तर घेराव घालणार का तुम्ही ? हे चुकीचं असल्याचंही पाटलांनी यावेळेस सांगितलं.
दरम्यान ईडीच्या (ED) कारवाईवरून त्यांनी शरद पवार यांनाही खोचक टोला लगावला. तीन वर्षांपूर्वी एका नेत्याला ईडीची नोटीस आली त्यावेळी हजारोच्या संख्येनं आंदोलन केलं. कशाला ईडी पाहिजे मीच स्वतः ईडीकडे जातो म्हणत हजारो नागरिक गोळा केले, या सगळ्याचा ईडीवर काही परिणाम होणार नाही, असे सांगत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला.