मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) महाविकास आघाडीला (MahaVikas Aghadi) जेवढी मत मिळायला हवी होती तेवढी मत आघाडीला मिळाली नाहीत. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thakrey) सांगायचं आहे की तुम्ही अल्पमतात आलेल्या आहात तुम्ही राजीनामा द्या, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आघाडीतील आठ ते नऊ आमदार फुटतात तर विश्वासाहर्ता आहे कुठे? स्वतःचे आमदार सांभाळत नाहीत आणि बढाया मारतात.
तसेच आम्ही विरोधात असूनही आमदार एकसंध ठेवू शकतो. निवडणुकांपूर्वी काहीजण बढाया मारत होते तीन जागा काढणार. भाजपाची मते फोडणार. मात्र प्रत्यक्षात काय झालं. राऊत काठावर आले आहेत. आमच्या हातातून वाचले, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut ) टोलाही लगावला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या (CM Of Maharashtra ) इतिहासात न वापरलेली भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मुख्यमंत्र्यांची भाषा संसदीय नव्हती. शरद पवारांनी निकालानंतर ची प्रतिक्रिया दिली त्यातून बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणायला शिका. माणुसकीचा धर्म पवारांनी पाळला. कोणाला कधी तरी चांगलं म्हणा असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळेस दिला.