नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच ‘झुंड’ या चित्रपटात झळकली होती. आता रिंकू पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतीय. सध्या रिंकू राजगुरुचा एक फोटो सोशल मीडियावर भयानक व्हायरल होतोय. भयानक या साठी तर या फोटोतील रिंकूचा भयानक चेहरा पाहून चाहते चिंतेत पडलेत. नक्की रिंकूच्या चेहऱ्याला झालं तरी काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.
खरंतर रिंकूचा आगामी सिनेमा ‘आठवा रंग प्रेमाचा’ (Aathava Rang Premacha) दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच ‘झुंड’ या चित्रपटात झळकली होती.आता रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या रिंकू राजगुरुचा (Rinku Rajguru) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोतील रिंकूचा भयानक चेहरा पाहून चाहते चिंतेत पडलेत.
खरंतर रिंकूचा आगामी सिनेमा ‘आठवा रंग प्रेमाचा’ यातील हा फोटो आहे. यामध्ये ती रिंकू अॅसिड व्हिक्टिमची भूमिका साकारत आहे. यातीलच तिचा हा लूक आहे. प्रेमकथेबरोबर स्त्रियांवरील अत्याचार,अॅसिड हल्ला (Acid attack) असे गंभीर मुद्दे या चित्रपटातून हाताळण्यात आल्यात. रिंकू राजगुरू या चित्रपटात अॅसिड व्हिक्टिमची भूमिका केली आहे. त्यामुळे रिंकूने या भूमिकेसाठी पहिल्यांदाच प्रोस्थेटिक (prosthetic) मेकअप केला आहे. रिंकूनं आजवर केलेल्या भूमिकांमध्ये ही भूमिका खूपच वेगळी असल्यानं खास उत्सुकता आहे.