TOD Marathi

मुंबई :  सध्या मनोरंजन क्षेत्रात सोनाक्षीच्या रिलेशनशिपची चर्चा जोर धरू लागलीय. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोनाक्षी ‘नोटबुक’ फेम अभिनेता जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये (Sonakshi Sinha Zaheer Iqbal affair) असल्याचं बोललं जातंय. सोनाक्षी व जहीर हे दोघेही अद्याप यावर एक अक्षरही बोललेले नाहीत. पण आता जहीरच्या एका पोस्टनं मात्र सगळ्यांचं जबरदस्त लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये जहीरने चक्क सोनाक्षीवरच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

सोनाक्षी सिन्हाने 2 जूनला आपला वाढदिवस साजरा केला. मग जहीर याच्यात मागे कसा राहणार? जहीरने सोनासाठी एक स्पेशल बर्थ डे पोस्ट शेअर केली. जहीरने जरी पोस्ट थोडी उशीरा केली असली तरी पण ही पोस्ट वाचून सगळ्यांना कळायचं ते कळलं.