परभणीचा अभिनेता म्हणजे संकर्षण. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
2008 मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात तो दिसला होता. संकर्षणने ‘माझीया प्रियाला’ त्याचबरोबर ‘आभास हा’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
काही वर्षांपूर्वी सुरू असलेल्या झी मराठीवरील ‘रामराम महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्याने केलं. सोबतच लोभ असावा, मी रेवती देशपांडे या लता नार्वेकर यांच्या व्यावसायिक नाटकात संकर्षणने आपली उत्तम कामगिरी बजावली आहे. संकर्षण त्याच्या उत्तम अभिनयासोबतच त्याच्या दर्जेदार कवितांमुळे सर्वात जास्त चर्चेत असतो.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मा्लिकेत सध्या समीर आणि शैफालीचा लव्हट्रॅक सुरु आहे, पण तुम्ही संकर्षणच्या रियल आयुष्यातील शैफालीला पाहिलंत का?, संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीचं नाव शलाका आहे.
भल्या भल्या अभिनेत्रींनाही टक्कर देईल इतकी ती सुंदर दिसते संकर्षण कऱ्हाडेची बायको.
आपल्या बायकोसोबतचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो. गेल्यावर्षीच संकर्षण आणि शलाका आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याला मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचे नाव सर्वज्ञ आणि मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे.
संकर्षणची बायको शलाका ही देखील एक कलाकार आहे. खऱ्या आयुष्यात ती पेंटर असून आपले अनेक पेंटिंग ती सोशल मीडियावर शेअर करत असते.