भारतात (India) पुन्हा एकदा करोना संसर्गाने पुन्हा उचल खालली आहे. हे असतानाच आता महाराष्ट्रात व केरळमध्ये करोनाच्या नव्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. करोनाचा (Covid19) धोका असतानाच आता नोराव्हायरस या नव्या आजाराने धास्ती वाढवली आहे. केरळातील विझिंजममध्ये नोरोव्हायरसचे (Norovirus) दोन रुग्ण आढळले आहेत. (Norovirus patients found in Kerala)
केरळच्या अल्पुज्जा जिल्ह्यातील कायाकुलम प्राथमिक शाळेतील मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ८ विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर या मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी उपचारांदरम्यान दोन मुलांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर प्रशासनाने तातडीने मुलांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
नोरोव्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून ज्या क्षेत्रात हे रुग्ण सापडले आहेत तिथले नमुने गोळा करण्यात आले आहेत आणि त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागही तातडीने उपाययोजना करत असून राज्यातील नागरिकांनी चिंता करु नये, असं अवाहन आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी केलं आहे. नोरोव्हायरस आजारावर मात करता येऊ शकते, असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
नोरोव्हायरस हा अस्वच्छतेमुळं अधिक फैलावू शकतो. त्यामुळं या व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छता व साफसफाई खुप आवश्यक आहे. तसंच, हा व्हायरस स्पर्श करण्यानेही अधिक फैलावतो. नोरोव्हायरस हा प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला जाणारा एक व्हायरस आहे. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टीनल आजार होऊ शकतो. दूषित जागेच्या संपर्कात आल्यामुळे किंवा दूषित अन्न पोटात गेल्यामुळे या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्याशिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होऊ शकतो. इतकंच नाही तर नोरो व्हायरसचे अनेक प्रकार असल्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा नोरोव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. (Norovirus can affect again to a person)