नाशिक : नाशिकच्या निफाडमध्ये 1982 नंतर दुसऱ्यांदा कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या 05 जूनला रुईत कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कांद्याचा दर कमी असल्यामुळे सध्या कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी कांदा परिषद आयोजनाची माहिती दिली होती.
आता शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रुई गावात भव्य कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आलंय.
दरम्यान निफाड हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. निफाड तालुक्यातील रुई या गावात या परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र काही वर्षांपूर्वी म्हणजेच 1982 ला याच गावात कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शरद जोशी यांनी 1982 साली या गावात पहिली कांदा परिषद घेतली होती.