TOD Marathi

नागपूर:
महाराष्ट्र राज्यातुन इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. राज्यातील उमेदवार न दिल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. नगमा मोरारजी यांच्या नाराजीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव आशिष देशमुख यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे आणि पदाचा राजीनामा दिला. मात्र आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

इम्रान प्रतापगढ़ी यांच्या उमेदवारीविरुद्ध वाढणारी नाराजी काँग्रेस पक्ष कशी शमवणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

आशिष देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुखांचे मोठे पुत्र आहेत. माजी आमदार आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द कायमच चर्चेत राहीली. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आशिष देशमुख यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपने त्यांना काटोलमधून उमेदवारी दिल्यानंतर ते तिथून विधानसभेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे काका अनिल देशमुखांच्या विरुद्ध निवडून आले. त्यानंतर काही वर्षानंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला.