नाशिक : किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. (Hanuman Birth Place Controversy)
दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून वादाला तोंड फुटलं. आसन व्यवस्थेवरून सुरू झालेल्या वादाला फोडणी मिळाली आणि सुधीरदास पुजारी यांनी सरस्वती गोविंद गिरींवर माईक उगारला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.