मुंबई : निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत. तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाकडून अपेक्षीत होते, असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की, सभागृहाचा कालखंड हा पाच वर्षाचा आहे. तो संपण्याअगोदर नवीन सदस्यांचे गठीत होणे गरजेचे आहे. ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.
तसेच केंद्राकडून घटनात्मक चौकट मोडण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत, त्यात सर्वोच्च न्यायालयाने भर टाकण्याचे काम करु नये, असही आंबेडकर यावेळेस बोलताना म्हणाले आहेत.