पुणे : इंडियन प्रीमियर लीग १५ साठी खेळाडूंचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावर्षी आयपीएल मुंबईत खेळली अशी माहिती समोर येत आहे. आयपीएल २०२२ यंदा २७ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि बीसीसीआयने लीगच्या 15 व्या हंगामासाठी ठिकाणे निश्चित केली असल्याचे समजले जात आहे.
बीसीसीआय (BCCI) अधिकारी, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि फ्रँचायझी मालक यांच्यात ही बैठक झाली असून बैठकीत चार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. यावर्षीच्या आयपीएल मध्ये १० संघांचा सहभागी होणार असून त्यांच्यात एकूण ७४ सामने खेळले जातील.
मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम ही संभाव्य ठिकाणी म्हणून निवडली गेली आहेत. सोबतच्या छोटी काना मध्ये पुण्याचा हेच समावेश केला जाण्याची शक्यता दर्शवली जात आहे. सुरुवातीच्या चर्चेनुसार बीसीसीआयला ही स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करायची आहे आणि पहिला सामना मुंबईत होण्याची शक्यता आहे. पण नंतर मुंबईशी जवळीक पाहता पुणे देखील चित्रात आले असून निवडल्या गेलेल्या स्टेडियम मध्ये पोहोचण्यासाठी कुठल्याही हवाई प्रवासाची आवश्यकता नाही आणि या स्टेडियममध्ये व आजूबाजूला बायो-बबल निरोगी ठेवणे देखील सोपे जाणार आहे.आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि फ्रँचायझींसोबत होणाऱ्या बैठकीनंतर बीसीसीआय आयपीएलच्या स्थळांची अधिकृत घोषणा करेल.
मुंबईतील कोविड प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेला एक व्यवहार्य पर्याय म्हणून ठेवले आहे. मुंबईतील परिस्थितीवर लक्ष ठेवून 20 फेब्रुवारीपर्यंत स्थळांबाबत अंतिम निर्णय बीसीसीआयकडून फ्रँचायझींना कळवला जाईल.







