TOD Marathi

आयपीएलच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये ३७० फ्रँचायझींसाठी आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. पण, या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआयने १० फ्रँचायझींसाठी काही नियम तयार केले आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा ऑक्शनसाठीचे नियम खालीलप्रमाणे-

– आयपीएल २०२२ ऑक्शन हे पूर्णपणे बायो-बबलमध्ये पार पडणार आहे
– मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या फ्रँचायझींच्या प्रतिनिधींचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणे अनिवार्य आहे.
– बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून ९, १० आणि ११ तारखेला करण्यात येणारी RT-PCR चाचणी निगेटीव्ह असायला हवी.
– राईट टू मॅच (RTM) हा पर्याय यंदाच्या ऑक्शनमध्ये नसणार आहे.
– मुदत संपल्यानंतर कोणताही संघ त्यांच्या संघातील पूर्व खेळाडूला रिटेन करू शकत नाही.
– प्रत्येक फ्रँचायझीला या ऑक्शनसाठी प्रत्येकी ९० कोटीचे बजेट दिलेले आहे. त्यापैकी खेळाडूंवर ८० कोटी खर्च करायला हवेत.
– मागील १५ दिवसांत परदेश दौरा करून आयपीएलसाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ७ दिवस क्वारंटाईन रहावे लागेल तसेच दोन वेळा त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणे अनिवार्य आहे.
– मेगा ऑक्शनसाठी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाकडे बीसीसीआयचे लक्ष आहे. कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेल्या आणि विलगिकरणाचे नियम पाळणाऱ्या व्यक्तिलाच लिलावात सहभाग घेता येणार आहे.
– लिलावात सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं कोरोना लसीसंदर्भाची सर्व माहिती देणे आणि सर्व सदस्यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे.