पुणे: काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आहेत. नगर पंचायत निवडणूक प्रचारादरम्यान ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं. त्यामुळे भाजपने नाना पटोले यांना चांगलच धारेवर धरल आहे. भाजपकडून नाना पटोले यांचा निषेध केला जात आहे. मात्र आता पुन्हा एकदा नाना पटोले मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल आहे. ‘ज्याची बायको पळून जाते, त्याला मोदी म्हणतात’ या वक्तव्यामुळे नाना पटोले पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील अलका चौकात ‘जुते मारो आंदोलन’ केलं. या आंदोलनात नगरसेवक जगदीश मुळीक, पुणे भाजपचे शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी मोदींच्या समर्थनार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त केला आणि ‘या नाना पटोले यांचं करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय’ अश्या तीव्र घोषणाही यावेळी दिल्या.