सांगली: अवघ्या तेवीस वर्षाच्या असणाऱ्या रोहित पाटील यांनी कवठेमंहाकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत नगरपंचायतीच्या एकहाती सत्तेवर विजय मिळवला. त्यामुळे रोहित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा करिष्मा घडवून आणणाऱ्या रोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी पक्ष आता मोठी जबाबदारी टाकणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा नगरपंचायत निवडणूक निकालानंतर रोहित पाटील यांच अभिनंदन करत त्यांना पक्षातील मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. 23 वर्षीय रोहितने राष्ट्रवादीच्या चिन्हावर नगरपंचायत निवडणूक लढवली आणि विरोधकांचा पराभव करत सगळ्यांचं धक्का दिला. या विजयाने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची एक चांगली सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे.
आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पाच ते सहा वर्षे सांभाळली होती… तसचं राज्यात राष्ट्रवादीला सक्रिय करण्यात त्यांच मोठे योगदान होतं.. तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात आता रोहित पाटील यांच्याकडे आता युवा नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.