नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्ली येथील लक्ष्मी नगर भागात एक पाकिस्तानी दहशतवादी ओळख लपवून १५ वर्षांपासून राहत होता. त्याच्याकडून एके -४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद अशरफ अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अशरफ अली मौलाना म्हणून भारतात राहत होता.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी ही कारवाई केली. दहशतवाद्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याने ही शस्त्रे वाळूमध्ये लपवून ठेवली होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा मोहम्मद अशरफ उर्फ अली याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय ओळखपत्र मिळवले होते. तो भारतीय नागरिक म्हणून दिल्लीत राहत होता. त्याच्याकडून एके -४७ रायफल, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद सिंग कुशवाह यांनी दिली.
Delhi Police Special Cell arrests a terrorist of Pakistani nationality from Ramesh Park, Laxmi Nagar. He was living with a fake ID of an Indian national. One AK-47 assault rifle with one extra magazine and 60 rounds, one hand grenade, 2 sophisticated pistols with 50 rounds seized
— ANI (@ANI) October 12, 2021
या प्रकरणाची अधिक माहिती देताना दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली की एक दहशतवादी लक्ष्मी नगरमध्ये लपला आहे आणि येत्या काही दिवसात काहीतरी मोठी कारवाई करू शकतो. माहितीच्या आधारे, छापे टाकण्यात आले आणि अलीला सोमवारी रात्री १०च्या सुमारास त्याच्या घरातून अटक करण्यात आली.