टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 7 सप्टेंबर 2021 – 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी लाटेवर भाजपने सत्ता मिळवली. मागील 8 वर्षात मोदी सरकारने मोठे निर्णय घेतलेत. काही निर्णयांना अधिक प्रमाणात विरोध झाला. तर काही निर्णय हे वादग्रस्त ठरलेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आता कमी होत आहे.
देशात वाढणाऱ्या महागाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोक नाराज आहेत, असे एका अहवालात समोर आलंय. आगामी काळात जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने आरएस पुरात बुध्दीजीवींची बैठक घेतली होती. त्यात बैठकीत हा अहवाल सादर केल्याचं समोर आलं आहे.
संपूर्ण भारतात पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकार विरोधात लोकांची नाराजी आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या आगामी निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींची लाट चालणार नाही, असे बुध्दीजीवींनी या बैठकीत सांगितलं आहे. बुध्दीजीवींनी दिलेला हा अहवाल भाजपच्या दिल्ली मुख्यालयात देखील पोहोचला आहे. या अहवालावर भाजपच मंथन सुरू केलं आहे.
राजकीय पक्षांनी जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. भाजपने हि कंबर कसली आहे. भाजपने एक दोन नव्हे तर सुमारे 70 मंत्र्यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याचं आयोजन केलंय. त्यामुळे आता भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे.