टिओडी मराठी, दि. 2 सप्टेंबर 2021 – जगात प्रसिद्ध असलेली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनचे नवे सीईओ (CEO) अँडी जेसी यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. यंदा अमेझॉन कंपनी जगात सुमारे 55,000 उमेदवारांना नोकरी देणार आहे. लवकरच जॉब फेअर सुरू करणार आहे.
अँडी जेसी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हि घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी 55,000 लोकांना कामावर घेण्याचे नियोजन आहे. तसेच कंपनीला किरकोळ, क्लाऊड आणि जाहिरातींसह मागणीसह इतर व्यवसायांशी संपर्क साधण्यासाठी अधिक लोकांची गरज आहे.
साथीच्या काळात बर्याच नोकऱ्या बदलल्यात आणि असे बरेच लोक आहेत जे थोडी वेगळी आणि नवी नोकरी शोधत आहेत. अशा लोकांसाठी आम्ही अमेझॉन हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय जेणेकरून त्यांना कंपनीत काम करण्याची संधी मिळेल.
कंपनीच्या म्हणणयप्रमाणे यंदा काम्पोआणिआपल्या जगातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुमारे 20 टक्के वाढ करणार आहे. तसेच तंत्रज्ञानाशी निगडित हे नवीन जॉब्स असल्यामुळे अमेझॉनला आपली कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यातही मदत मिळणार आहे.
या पदांसाठी होणार भरती –
अमेझॉन कंपनी इंजिनीअरिंग, रिसर्च सायन्स आणि रोबोटिक्स या पदांसाठी भरती करणार आहे. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अमेझॉनने सुमारे 5 लाख उमेदवारांना नोकरी दिली होती. Amazonचे जॉब फेअर येत्या 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.