TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 सप्टेंबर 2021 – पुण्यातील शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे सहयोगी प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 02 सप्टेंबर 2021 आहे.

भरतीची पदे –

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
  • ग्रंथपाल (Librarian)

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.
  • ग्रंथपाल (Librarian) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज –

शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, डेक्कन, पुणे 411004.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 02 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.sclc.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.