टिओडी मराठी, 31 ऑगस्ट 2021 – एलोन मस्क यांच्या स्पेस एक्स रॉकेटने अंतराळ स्थानकामध्ये मुंग्या, ताजी फळे, मानवी आकाराचा रोबोटिक आर्म अशा अनेक वस्तूंची डिलीव्हरी केलीय. रविवारी स्पेस एक्सचे रॉकेट या सर्व सामानासह अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना झाले आहे. सोमवारी हे सामान अंतराळस्थानकामध्ये पोहोचणार आहे. मागील दशकात भारत स्पेस एक्सने केलेली ही २३ वी डिलीव्हरी आहे.
पुन्हा वापरता येणाऱ्या फाल्कन रॉकेटने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून रविवारी उड्डाण केले आहे. अंतराळ स्टेशनमध्ये असलेल्या ७ अंतराळवीरांसाठी आईस्क्रीम, आवाकडो, लिंबे, खूप ताजी फळे, प्रयोगासाठी मुंग्या आणि रोबोटिक आर्म असे २१७० किलो सामान ड्रॅगन कॅप्सूलमधून पाठविले आहे.
पहिल्या स्टेजच्या क्रुझर रॉकेटने स्पेस एक्सच्या समुद्रातील प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ग्रॅव्हीटासवर यशस्वी लँडिंग केल्याचे स्पेस एक्सने जाहीर केलं आहे. सध्या अंतराळ स्थानकामध्ये विविध कामे केली जात आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेल्या साहित्याची डिलीव्हरी अशाप्रकारे केली जात आहे.