टिओडी मराठी, पुणे, 31 ऑगस्ट 2021 – पुणे शहराला चालू आठवड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या देखभाल दुरुस्तीचं कामं केलं जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुणेकरांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडणार आहे. गुरुवारी एक दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केलं आहे. शुक्रवारी उशीरा शहरात पाणीपुरवठा सुरळीत करणार आहे. पण, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पुणेकरांची तारांबळ उडणार आहे. पर्वती जलकेंद्र पंपिंग, वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एस एन डी टी /वारजे जलकेंद्र, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपिंग येथील विद्युत पंपिंग विषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामं केलं जाणार आहे.
त्यामुळे गुरुवारी (2 ऑगस्ट) रोजी शहरामध्ये पाणी पुरवठा बंद ठेवणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशीरा कमी दाबाने पाणी पुरवठा करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केलं आहे. त्यानंतर शनिवारपासून शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होईल.