टिओडी मराठी, नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021 – भारत देशाची आर्थिक स्थिती आणि करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेची रिकव्हरी याविषयी चर्चा करून आढावा घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर 2021 ला एफएसडीसी म्हणजेच फायनान्शीअल स्टॅबिलिटी ऍन्ड डेव्हलपमेंट कौन्सिलची बैठक आयोजित केलीय.
या आर्थिक वर्षातील एफएसडीसीची ही पहिली बैठक असून याअगोदर 15 डिसेंबर 2020 ला या कौन्सिलची बैठक झाली होती. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. देशाच्या अर्थकारणात सध्या रिकव्हरीचे संकेत मिळू लागलेत.
चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 20 टक्क्यांच्या आसपास राहील, असा अदांज वर्तवला आहे. मागील वर्षी या तिमाहीत भारताचा विकास दर उणे 24.4 इतका राहिला होता. केंद्र सरकारने अलिकडे सरकारी मालत्तांच्या मॉनिटायझेशनचा प्रस्ताव मांडला असून त्या अनुषंगानेही या बैठकीत आढावा घेतला जाईल, असे सांगण्यात येते.