टिओडी मराठी, दि. 24 जुलै 2021 – नुकताच काऊंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाने 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल DigiLocker वर बघता येणार आहे.
यंदा दहावीच्या निकालात मुले आणि मुली यांची कामगिरी समान राहिली आहे. तर 12 वीच्या निकालामध्ये मुलींच्या तुलनेत मुलांनी 0.2 टक्के उत्तम कामगिरी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटामुळे आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. या बोर्डाने पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे हा निकाल तयार केला आहे.
दहावीमध्ये मुले आणि मुलींच्या यशाचं प्रमाण 99.98 टक्के इतकं आहे. तर 12 वीच्या मुलींच्या निकालाचं प्रमाण 99.86 टक्के इतकं आहे.
तसेच मुलांच्या निकालाचं प्रमाण 99.66 टक्के इतकं आहे, असे आयसीएसई बोर्डाचे मुख्याधिकारी आणि सचिव गॅरी एराथून यांनी सांगितले आहे.
SMS द्वारे बघा निकाल
ISCE आणि ISC बोर्डाचा निकाल आता SMS द्वारे बघता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना आपला युनिक आयडी 09248082883 या नंबरवर पाठवावा. ICSE/ISC (यूनिक आईडी) असा या SMS चा फॉरमॅट असेल. यावर SMS पाठवल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना निकाल मिळेल.