TOD Marathi

टिओडी मराठी, जालोर, दि. 17 जुलै 2021 – जालोर जिल्ह्यातील सांचोर भागात विकासाच्या नावाखाली एका प्रशासकीय अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पोटावर लाथ मारल्याचं कृत्य केलं आहे. याचा एक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील प्रतापपुरा गावामध्ये भारत माला प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या हायवेअंतर्गत मोबदल्यासाठी शेतकऱ्य़ांनी इथलं बांधकाम काम थांबवलं होतं. यावेळी सांचोर एसडीएमने शेतकऱ्यांना लाथाडलं आहे.

एवढंच नव्हे, तर प्रशासकीय कर्मचाऱ्याने 15 वर्षांच्या एका मुलीला चालत्या वाहनातून बराच वेळ फरफटत नेऊन त्यानंतर फेकलं. यामुळे आक्रमक शेतकरी झाले आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी गावकऱ्यांना घटनास्थळाहून बाजूला केलं. या प्रकरणात शेतकऱ्यांनी आज सांचोर उपखंड कार्यालयाला घेराव घातला.

प्रतापपुरा गावात गुरुवारी झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका व्हिडीओमध्ये एसडीएम भूपेंद्र यादव हे नरसिंगराम चौधरी या शेतकऱ्याला लाथ मारताना दिसताहेत. दुसऱ्या एका व्हिडीओत मुलीला चालत्या वाहनातून फटफटत नेऊन काही अंतरावर फेकून दिलं.

मुलगी जर वाहनाच्या टायर खाली आली असती तर तिचा जागेवरच मृत्यू झाला असता. मात्र, सुदैवाने अशी कोणतीही घटना घडली नाही. अमृतसर ते जामनगरपर्यंत तयार होणाऱ्या एक्सप्रेस 754 चं काम प्रतापपुराच्या सीमेवरुन गुरुवारी सुरू झालं होतं. मात्र, गावकऱ्यांनी हे काम थांबवलं होतं. जमिनीचा योग्य तो मोबदला मिळाला नाही, असं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण :
जमिनीचा बाजारातील भाव 10 लाख रुपये बिघा आहे, असं सांगितलं जात आहे. मात्र, डीएलसीने 45 हजार रुपये बिघा दिला जातोय. याबाबत शेतकरी 2019 मध्ये हायकोर्टामध्ये गेले होते. अद्याप याबाबत अद्याप निकाल आलेला नाही.

कोरोनामुळे सुनावणी पुढे ढकलली आहे. यावर शेतकऱ्यांनी सांगितलं की, घर, झाडं, विहिरीसह अनेक गोष्टींचा निधी अजून दिलेला नाही. हा प्रकल्प बडसम ते गुजरात बॉर्डरपर्यंत 10 किलोमीटर आहे. दुसरीकडे निर्णय येईपर्यंत कंपनी काम रोखण्यास तयार नाही. अजूनही 90 टक्के शेतकऱ्यांना त्यांचा मोबादला दिलेला नाही.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज