टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 जुलै 2021 – आज दहावीचा निकाल जाहीर झाला आणि दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला जाईल, असे बोर्डाकडून सांगितले होते. मात्र, लाखो विद्यार्थी एकाच वेळी निकाल वेबसाईटवर पाहत होते. त्यामुळे बोर्डाच्या निकालाची क्रॅश झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी आल्या. मात्र, आता ही वेबसाईट क्रॅश का झाली? आणि पुन्हा सुरु होण्यास किती वेळ लागेल? अशा प्रश्नांनी विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत.
www.result.mh-ssc.ac.in आणि www.mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला होता. मात्र, एक वाजता वेबसाईटचं क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे.
बोर्डाकडून मात्र अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, अचानक वेबसाईटचे हिट्स वाढल्याने वेबसाईट क्रॅश झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.
वेबसाईटसाठी एवढा वेळ लागणार :
अचानक वेबसाईट्सचे यूजर वाढल्याने ही साईट क्रॅश झाली. मात्र, आता ही समस्या सोडवण्यासाठी कमीतकमी दोन ते तीन तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, प्रयत्न करत राहावेत. तसेच घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.