टिओडी मराठी, पुणे, दि. 8 जुलै 2021 – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोरोना करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सरकार राबवत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला मर्यादित लसचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधक लसीचे गुरुवारी केवळ ‘कोवॅक्सीन’ डोस उपलब्ध करून दिले आहेत. हे डोस सहा केंद्रांवर मिळणार आहेत. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून दिले आहेत.
18 वर्षावरील सर्व नागरिकांना गुरुवारी कोवॅक्सीनचा पहिला डोस मिळणार असून त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांसाठी तर 20 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करणाऱ्यांना दिली जाणार आहे.
याशिवाय 9 जून रोजी कोवॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे. त्या 18 वर्षांवरील नागरिकांना गुरूवारी 40 टक्के लस ऑनलाइन बिुकंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करणाऱ्यांना दिली जाणार आहे.
तसेच दिव्यांग आणि गर्भवती महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे.