TOD Marathi

प्रश्न विचारायचे असतील तर मला CM करा ; छत्रपती संभाजीराजे यांची ‘यांच्याकडे’ मागणी; म्हणाले, अगोदर BJP मधून तुम्ही बाहेर पडा

टिओडी मराठी, बीड, दि. 3 जुलै 2021 – महाराट्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक प्रमाणात गाजत आहे. पुन्हा मराठा आरक्षणाबाबत दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तरीही भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे अनेक बाजुंनी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांना प्रश्न विचारले जात आहेत. यावर प्रश्न विचारणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असे म्हणून उत्तर दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या अखत्यारीत आहे, असे म्हटले आहे. त्यावरून आता पुन्हा एकदा राजकारण होत असल्याचे दिसत आहे.

त्यातच आता मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. यासाठी सध्या संभाजीराजे हे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी आपण का करत नाही?. त्यावर संभाजीराजे म्हणाले, मला प्रश्न विचारायचे असतील तर, मला मुख्यमंत्री करा. संभाजीराजेंना २००८-०९ सोबत घेऊन आम्ही यात्रा काढली होती. आम्ही त्यांना आपलं समजतो.

संभाजीराजेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना भाजप पक्षातून बाहेर पडावं लागेल. दुसरा पक्ष काढावा लागेल. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आमच्या पक्षात यावं, तसेच याचं नेतृत्व करावं. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू, अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना दिली आहे.

तसेच छत्रपती संभाजीराजे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतील, असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर येथील मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले होते. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला आहे.

समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला आहे. याचा अर्थ मी मॅनेज झालो, असे काढणे चुकीचे आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्याने मी मॅनेज होणार नाही, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी केले होते.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज