टिओडी मराठी, नांदेड, दि. 13 जून 2021 – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापण्यास सुरुवात झालीय. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या मुद्दावर राज्यभर मोर्चे काढण्याचा इशारा दिलाय. तर, भाजप देखील मराठा आरक्षणावरून आक्रमक झालंय. यावर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी संभाजीराजे यांना आरक्षणाच्या मुद्दावर सल्ला दिलाय.
मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार?, असा सवाल करत त्यापेक्षा ज्या-ज्या पक्षाचे खासदार संसदेमध्ये आहेत. तिथे त्यांनी आवाज उठवला तर फायदा होईल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलीय.
याअगोदर खासदार संभाजीराजे यांनी १६ जून रोजी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार आहे, असे स्पष्ट केलं आहे. त्यावरून अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. तसेच सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे.
मग, हा मोर्चा कोणाच्या विरोधात काढणार?, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनी भूमिका घेतली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असेही मोदी यांनी म्हटलंय.