टिओडी मराठी, दि. 2 जून 2021 – ‘द वॉल्ट डिस्ने’ कंपनी यंदा दक्षिण पूर्व आशियामध्ये स्टार स्पोर्ट्स आणि फॉक्स स्पोर्ट्ससह सुमारे 100 चॅनल्स बंद करणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब चापेक यांनी हि घोषणा केली आहे.
जेपी मोर्गनच्या वार्षिक जागतिक प्रौद्योगिकी, मिडिया व दूरसंचार संमेलनात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी चापेक यांनी २०२० मध्ये ३० चॅनल बंद केल्याची माहिती दिलीय. त्यासह २०२१ मध्ये १०० चॅनल बंद केले जाणार आहे,असे सांगितले.
डिस्नेने भारतासह हॉंगकॉंगमध्ये अनेक स्पोर्ट्स चॅनल बंद करण्याच्या निर्णयानंतर ‘डीटूसी’ कडे वळण्याचे संकेत दिलेत. यंदा सप्टेंबरमध्ये स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, फॉक्स स्पोर्ट्स ३ सह १८ चॅनल बंद केले जाणार आहेत. भारतात हे सर्व चॅनल बंद होणार का? याचा स्पष्ट खुलासा केलेला नाही.
चापेक यांच्या मते, भारत एक वेगळं मार्केट आहे. हे मार्केट असामान्य असा आहे. त्यांच्याकडे बँड विड्थ कमी असल्याने भारतासह वेगळे धोरण आखावे लागणार आहे. भारतात स्थानिक भाषा ह्या अधिक महत्वाच्या आहेत. आणि अशावेळी बँड विड्थ कमी असल्याने नक्की कशावर फोकस करावा? असा प्रश्न पडत आहे.