TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 1 जून 2021 – शहरात कोरोनाचा फैलाव कमी झाला असून रुग्णसंख्याही घटली आहे. शहरातील विलगीकरण केंद्रांत कोविड सेंटरमध्ये पंधरवड्यापूर्वी असलेली 2 हजार 180 रुग्णसंख्या आज 227 पर्यंत आली आहे. त्यामुळे अशा सेंटरमधील 90 टक्के बेड खाली आहेत.

कोरोनाग्रस्तांमधील सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी महापालिकेची सध्या केवळ पाच विलगीकरण केंद्रे सुरू आहेत. तर घरीच राहून उपचार घेत असलेले रुग्णही 2 हजार 736 पर्यंत कमी झाले आहेत.

पुणे शहरात 25 मार्चला विलगीकरण केंद्रांत साडेचारशे बेड होते. त्यावेळी 207 बेडवर कोरोनारुग्ण होते. एप्रिलअखेरीला बेडची संख्या एक हजारपर्यंत वाढली त्यावेळी 998 बेड फुल्ल होते.

13 मे रोजी महापालिकेच्या आणि खासगी कोविड केअर सेंटरमध्ये 3 हजार 608 बेड उपलब्ध होते. त्यापैकी दोन हजार 180 बेडवर रुकोरोना ग्ण होते, तर एक हजार 428 बेड खाली होते. आज सुमारे साडेतीन हजार बेड म्हणजे जवळपास 90 टक्के बेड खाली आहेत.

पालिकेने अनेक विलगीकरण केंद्र बंद केली आहेत. सध्या महापालिकेतर्फे सध्या गंगाधाम, खराडी, संत ज्ञानेश्वर वसतिगृह, हडपसर येथील बनकर आणि एसएनडीटी येथे विलगीकरण केंद्रे सुरू आहेत.

या पाच केंद्रांत मिळून सुमारे दीड हजार कोरोना बाधितांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या या ठिकाणी 227 जणांचे विलगीकरण केले आहेत. सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण विलगीकरण केंद्रात ठेवले जातात. त्यांना औषधे दिली जात आहेत. महापालिकेच्या केंद्रांत एक हजार 550 बेड आहेत.

विलगीकरण केंद्रांत 1 हजार 997 बेडची व्यवस्था होती. महापालिकेच्या सेंटरमध्ये सध्या अडीचशेपर्यंत रुग्ण आहेत. खासगीमध्ये दोनशेच्या आसपास रुग्ण आहेत. अनेक खासगी केंद्रे रुग्ण नसल्यामुळे बंद झालीत. घरी राहून उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या एप्रिलमध्ये खूप वाढली होती. 18 एप्रिल रोजी सर्वाधिक 47 हजार 329 रुग्ण गृह विलगीकरणात होते.

लॉकडाऊनच्या काळात संसर्ग कमी झाल्याने सौम्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. घरी असलेल्या रुग्णांची संख्या आज चार हजार 681 पर्यंत कमी झालीय. रुग्णालयात आज दोन हजार 736 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्याधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज