टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 31 मे 2021 – पुढील जून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध होतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. यासाठी करोना लसींची अतिरिक्त माहिती केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली जात आहे.
देशात करोना लसचा तुटवडा भासत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे. यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
आता सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला जून महिन्यात 10 कोटी लस देणार आहे, सांगितले आहे. याबाबतचे पत्र सीरम इन्स्टिट्यूटने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.
जून महिन्यात आम्ही 10 कोटी कोविशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करत पुरवठा करणार आहे. मे महिन्यात 6.5 कोटी डोसची निर्मिती करून त्याचा पुरवठा केला होता. देशातील मागणी पाहता आम्ही लसींचे उत्पादन वाढविले आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे. आमची संपूर्ण टीम सरकारसोबत करोनाविरुद्ध लढण्यास मैदानात उतरली आहे, असे कंपनीच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
पुण्यातील कोविशिल्ड व्हॅक्सिननिर्मिती कंपनीत दिवस-रात्र काम सुरू असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. देशातील करोना लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यातून सांगितले आहे.