टिओडी मराठी, पुणे, दि. 24 मे 2021 – वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देऊन शासन लाभ मिळावेत, यांसह विविध मागण्यांसाठी
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या सहा प्रमुख कायम कामगार संघटनांची वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समिती सोमवारपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे.
कंत्राटी वीज कामगार संघाने कायम कामगारांच्या कृती समितीला पाठिंबा जाहीर केलाय. संघाचे सुमारे 12 हजारांवर सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहेत. कंत्राटी कामगार हिताच्या मागण्या असल्याने हा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले आहे.
कंत्राटी कामगारांच्या कुटुंबाला लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे, कोविडचा उद्रेक पाहता काळात विजबिल वसुली सक्ती करू नये, या मागण्या केल्या आहेत.