टिओडी मराठी, दि. 20 मे 2021 – जगातील सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने मागील 25 वर्षे अविरतपणे सेवा देणारे इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हे इंटरनेट एक्सप्लोरर पुढच्या वर्षी 15 जून 2022 या दिवशी बंद होणार आहे. तसेच ‘मायक्रोसॉफ्ट एज्’ त्याची जागा घेणार आहे, अशी घोषणा मायक्रोसॉफ्ट कंपनीने केली आहे.
आता ‘मायक्रोसॉफ्ट एज्’ विंडोज् 10 वरील इंटरनेट एक्सप्लोररची जागा घेणार आहे, अशी घोषणा ‘मायक्रोसॉफ्ट एज’चे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडरसे यांनी केलीय. त्यासह इंटरनेट एक्सप्लोरर 11 डेस्कटॉप अॅप्लिकेशन हे 15 जून 2022 रोजी आता निवृत्त होणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
कंपनीने दोन वर्षांपूर्वी ‘मायक्रोसॉफ्ट एज्’ इंटरनेट एक्सप्लोरर मोडची निर्मिती केलीय. ते आता बऱ्यापैकी अनेक व्यवहारांची जागा घेतंय. तसेच जुन्या वेबसाईटची जागा हे क्रोमिअम आधारित ब्राऊजर घेणार आहे. त्यासंबंधी अनेक व्यवहारही त्याने अॅडॉप्ट केलेत. इंटरनेट एक्सप्लोरर मोड ही जुन्या अॅक्टिव्ह एक्स कन्ट्रोल साईट असून त्याचा उपयोय अजून देखील अनेक व्यवहारांसाठी होत आहे.
मायक्रोसॉफ्टने मागील वर्षी आपल्या मायक्रोसॉफ्ट टीमच्या वेब अॅपचा इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट काढून घेतल्यानंतर या वर्षीच्या शेवटापर्यंत मायक्रोसॉफ्टच्या 365 सेवांचा इंटरनेट एक्सप्लोररचा सपोर्ट काढून घेतला जाणार आहे.
त्यामुळे आता मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस 365, वनड्राईव्ह, आऊटलूक आणि इतर सेवांचा सपोर्ट 17 ऑगस्टनंतर बंद करणार आहे. मागील पाच वर्षांपासून आपल्या ग्राहकांनी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर बंद करावा, यासाठी मायक्रोसॉफ्टकडू प्रयत्न केले जात होते.