TOD Marathi

आयर्लंडच्या आरोग्य यंत्रणेवर सायबर हल्ला!; लाखो युरोचे नुकसान

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, डब्लिन (अयर्लंड), दि. 18 मे 2021 – एका सायबर हल्ल्याची लक्षणे दिसल्यामुळे आयर्लंडच्या आरोग्य सेवा नियंत्रकांनी शुक्रवारी आपल्या सर्व माहिती तंत्रज्ञान प्रणाली बंद ठेवल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. या सायबर हल्ल्यामुळे आयरिश आरोग्य सेवा विभागाला आयटी सिस्टमची पुनर्बांधणी करण्यासाठी कोट्यवधी युरो खर्च करावा लागणार आहे, अशी शक्‍यता वर्तविली आहे.

या सायबर हल्ल्यामुळे आरोग्य विभागाच्या आयटी सिस्टीमचे नुकसान झाले आहे. त्याची फेरउभारणी करण्यासाठी पुढील आठवड्यापर्यंत तज्ञांना काम करावे लागणार असून आंतरराष्ट्रीय सायबर क्राइम टोळीने हा हल्ला केलाय, असे आयर्लंड सरकारने म्हटले आहे.

या हल्ल्यामुळे कोविड-19 च्या लसीकरण कार्यक्रमावर विशेष परिणाम झालेला नाही. मात्र, टेस्टींग आणि ट्रॅकिंगची प्रणाली आरोग्य सेवा अधिकाऱ्यांनी पुन्हा व्यवस्थित सुरू केलीय. मात्र, त्यासाठी काही तासांचे प्रयत्न करावे लागले. सर्व रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवेच्या रुग्णांच्या पूर्वनियोजित भेटी रद्द केल्या आहेत.