TOD Marathi

मुंबई | मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी नुकतीच ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी भगवद्गीता की संविधान? यापैकी एक निवडावं लागलं तर ते काय निवडतील हेही त्यांनी सांगितलं. तसेच भारत-पाकिस्तानच्या फाळणीवरही त्यांनी भाष्य केलं.

“मी कट्टर हिंदुत्ववादी, सावरकरवादी, सनातन धर्म मानणारा आहे. जर मला कुणी ‘शरद भगवद्गीता की संविधान?’ असा प्रश्न विचारला, तर एका क्षणाचाही विलंब न लावता मी संविधान असं उत्तर देईन. माझी भगवद्गीता नंतर येईल, संविधान पहिलं येईल. मला संविधान म्हणायला क्षणही लागणार नाही. हाच प्रश्न तुम्ही मुसलमानाला विचारा. मी जर उद्या अमेरिकेत स्थायिक झालो, तिथलं नागरिकत्व घेतलं आणि ठरवलं की आता आयुष्य अमेरिकेत घालवायचं आहे तर अमेरिकेचं संविधान, त्यांची घटना माझ्यासाठी प्रायोरिटी असेल. घरात भगवद्गीता, जय श्री राम सगळं करेन. मी जंगी देवघर बांधेन, सकाळ, दुपार संध्याकाळ मी पूजा करेन. पण बाहेर पडलो की मी अमेरिकन असेन,” असं शरद पोंक्षे म्हणाले.

हेही वाचा “ …मुश्रीफांच्या दाव्यावर आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले, पक्षाकडून सहानुभूती…”

पुढे ते म्हणाले, “याच कारणामुळे पासपोर्टसाठी हिंदुंना जगभरात कुठेही अडचणी येत नाही. हिंदू नावं दिसली की लगेच पासपोर्ट मिळतो पण खान, सय्यद अशी मुस्लीम नावं आली की थांबवतात. शांततेचा धर्म आहे म्हणून एकीकडे बोंबाबोंब करता, मग एकही मुस्लीम देश शांत का नाही? तिथे त्यांना मारायला हिंदू नाहीयेत ना, मग पाकिस्तान एवढं का धगधगतंय? त्यांना त्यांचा वेगळा देश हवा होता, तो घेतला ना. मग राहा की आनंदाने शांत. वेगळे झाले तरी त्यांची काही भावंडे भारतात राहिली. आमचे तिकडे जात नाहीत.”

शरद पोंक्षे यांनी भारत पाकिस्तानच्या फाळणीवरही भाष्य केलं. “फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात १५ टक्के हिंदू होते, ते आता फक्त अर्धा टक्का उरलेत, भारतात ८ टक्के मुस्लीम होते ते आता २३ टक्क्यांवर आलेत. तरी हिंदू राष्ट्र वाईट? हे सगळं कधी संपणार” असा प्रश्न शरद पोंक्षे यांनी केला. “जोपर्यंत हिंदू या देशात बहुसंख्य आहेत, तोपर्यंतच या देशात धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव टिकून आहे. ज्यादिवशी हिंदू ४९ टक्के होतील आणि मुस्लीम ५१ टक्के होतील, त्यादिवशी सगळं संपलेलं असेल,” असं ते म्हणाले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज