मुंबई | ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपू्र्वी आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता नीलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
डॉ. गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणूनही नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाहिलं जात होतं. भाजपसोबतची युती तुटल्यानंतर ठाकरेंची बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांचा ठाकरे गटाला रामराम म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्का आहे.
हेही वाचा ” …शिंदे गटातील नाराजीवर बच्चू कडूंचं मोठं विधान, म्हणाले…”