सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे तर त्याच्या वरती असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो मार्ग अनुक्रमे तिसरा आणि चौथा स्तर तयार करतील. तो एकूण 5.3 किमी असेलल्या आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्टचा (double decker viaduct) भाग आहे. अफकॉन्सने दोन महिन्यांच्या विक्रमी वेळेत 1,650 MT वजनाचा हा 80 M डबल-डेकर स्टील स्पॅन उभारला आहे. गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर जिथून दररोज 150 हून अधिक रेल्वे आणि एक लाखाहून अधिक वाहने जातात त्यावरती स्टील सुपरस्ट्रकचर (steel superstructure) ठेवण्यात आले आहे. अवाढव्य 18.9 M रुंद गर्डरचे लाँचिंग (girder launching) ही भारतीय रेल्वेतील कदाचित पहिलीच घटना ठरणार आहे.
8,000 स्ट्रक्चरल घटकांसह 1,650MT स्ट्रक्चरल स्टीलसह तयार केलेला डबल-डेकर ओपन वेब गर्डर (OWG) हा गेल्या हिवाळ्यात गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर ठेवण्यात आला होता. स्पॅन (span) जमिनीपासून 28 मीटर उंचीवर आहे. इतकं आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या कामाचा भारतात यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नसल्याचा दावा अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण कुमार यांनी केला. ते म्हणाले. 80 M स्टील स्पॅन व्यतिरिक्त, प्रत्येकी 25 M असणारे स्पॅन आरसीसी डेक स्लॅबसह दोन कंपोझिट गर्डरने पूर्ण करणे आवश्यक होते. पूर्वतयारीच्या टप्प्यात, टीमने साइटवरील जागेची अडचण, तीव्र हिवाळा, अवेळी पाऊस, कोरोना महामारी तसेच मुदतीमध्ये प्रकल्पाची तांत्रिक गुंतागुंत हाताळली.
या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये