TOD Marathi

मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील नागपूर – मुंबई दरम्यान असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे येत्या ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागपूर ते शिर्डी हा एकूण ५२९ किलोमीटर मार्गाचा टप्पा सर्व नागरिकांसाठी खुला होणार आहे. दि. ४ डिसेंबर (रविवार) रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समृद्धी महामार्गावरून टेस्ट राईड घेतली. स्वतः फडणवीस यावेळी ड्रायव्हिंग सीटवर होते, तसेच त्यांनी नागपूर ते शिर्डी असा ५२९ किलोमीटर चा प्रवास मर्सिडीज या कार ने १५० किलोमीटर प्रति तास या स्पीडने केला.

मर्सिडीज कारवरून कल्लोळ
अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) या संघटनेच्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांची नियुक्ती केली होती. अजय अशर हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे आणि शिंदे यांचे घनिष्ट असे संबंध आहेत. तसेच
फडणवीस यांनी चालवलेली कार ही देखील एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षाने या संदर्भात ट्विट करून राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. तेव्हा काँग्रेस पक्षाकडून जी माहिती जाहीर करण्यात आली त्यानुसार, फडणवीस चालवत असलेली गाडी (Mercedez Benz) ही कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकीची आहे. या प्रकारामुळे विरोधकांना ती कार बांधकाम व्यावसायिकाची आहे व आता त्यांना राज्य देखील चालवायला देणार का ? अशा प्रश्नांना पेव फुटला आहे.

 

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र (Prime Minister Narendra) मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला होणार आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या फेजच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत (Prime Minister Narendra Modi is coming to Maharashtra to inaugurate the first phase of Balasaheb Thackeray Samriddhi Highway). पंतप्रधानांच्या या दौऱ्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या पहिल्या फेजचा पाहणी दौरा केला. (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis are on an inspection tour of the first phase today). मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सकाळी नागपूर येथे आगमन झालं, त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी एकत्र या दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य हे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत होते. प्रचंड मोठा फौजफाटा या एकूण दौऱ्यामध्ये होता.

देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा ‘बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग’ या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. (PM Narendra Modi to inaugurate phase 1 of Balasaheb Thackeray Samruddhi Highway on 11th December ) या पार्श्वभूमीवर नागपूर ते शिर्डी दरम्यान झालेल्या फेज वनची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. ही पाहणी आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.