TOD Marathi

जळगाव:
जळगाव दूध संघ निवडणूक (Jalgaon Dudh Sangha Election) प्रचारात खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) सासू मंदाताई खडसे (Mandatai Khadse) यांच्याविरोधातच उभ्या ठाकल्या आहेत.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत मुक्ताईनगर मतदार संघात महविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यामध्ये चढाओढ होताना दिसत आहे.

चर्चा का होत आहे ?
भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या सासू मंदा खडसे या महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. परंतु एकीकडे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील निवडणूक लढवत असल्याने खासदार रक्षा खडसे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सासूच्या बाजूने प्रचार न करता त्यांनी मंदाताई खडसे यांच्या विरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन त्यांचा पॅनल विजयी करायच्या घोषणा मतदारांना केल्या आहेत.
या कारणामुळे सासू आणि सुनेमधील ही विरोधी लढत सध्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
दि. ४ डिसेंबर (रविवार) मुक्ताईनगर येथे रक्षा खडसे यांनी प्रचारसभेत सर्व मतदारांना शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले व योग्य व्यवस्थापन करून देऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच शेतकरी विकास पॅनलला विजय करण्याचं आवाहन केले आहे.
सासू विरोधात सून असल्यामुळे रक्षा खडसे यांना त्यांच्या मतदार संघातून आपल्याच घराणेशाही व दूध संघातील अपहार टीका ऐकायला मिळत जरी असली तरी त्या आपल्या संघाशी एकनिष्ठ असून पॅनल विजयी करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.

मात्र आता सासू विरोधात सून लढत असून यश कोणाला मिळते हे लवकरच समजेल. सध्या तरी या सासू-सून विरोधातील राजकीय लढाई सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असून सर्वत्र गाजत आहे.