Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
ठाकरे-शिंदे होणार शेजारी शेजारी..?

TOD Marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्यात खरी शिवसेना कोणाची यावरून आधीच वाद सुरू आहे. (Shivsena UBT and Balasahebanchi Shivsena office set up) एकमेकांना शह-काटशह देण्यातही हे दोन्ही पक्ष सतत आघाडीवर आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये आता आणखी एक नवी घडामोड होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिवालय हे मध्यवर्ती कार्यालय मंत्रालयासमोर असताना आता त्याच्याच बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde to set his party office beside Shivsena UBT party) यांच्या पक्षाचेही मध्यवर्ती कार्यालय थाटण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांतच हे कार्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे ठाकरे शिंदे हे या निमित्ताने शेजारी होणार आहेत.

खरी शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेला संघर्ष न्यायालयात पोहोचला आहे. (Thackeray VS Shinde war in politics) दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये कोणी मेळावा घ्यायचा यावरूनही दोन पक्षांत संघर्ष पेटला होता. पक्षाच्या शाखांवरूनही या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून येत असतात. याशिवाय ठाकरे आणि शिंदे यांच्यातही सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. आता तर दोन्ही पक्षांची कार्यालयेच आजुबाजूला सुरू होणार आहेत.

शिवसेनेतून बंड करीत बाहेर पडणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लावत नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांनी मूळ शिवसेना पक्षावरही दावा केला. शिवसैनिकांबरोबरच शिवसेनेच्या शाखाही आपल्याकडे येतील, यासाठी बाळासाहेबांची शिवसेना प्रयत्न करीत आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्याचा विचार पुढे आला, तेव्हा हे कार्यालय कुठे असावे यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शिवाजी पार्क येथील शिवसेना भवनजवळ अथवा ठाण्यात हे कार्यालय असावे, असा विचार काही जणांनी मांडला होता. मात्र आता हे कार्यालय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मंत्रालयासमोरील मध्यवर्ती कार्यालयाच्या शेजारीच असणार आहे. मंत्रालयासमोर शिवालय कार्यालय आहे. त्याच्या बाजूलाच सी-२ या बंगल्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यालय असणार आहे.

 बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालय कसे असेल ?

एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये भव्य सभागृह असेल. त्याचसोबत राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी विविध सुविधा देखील असतील. पत्रकार परिषदा, बैठका आणि मेळाव्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे. पक्षाच्या प्रमुखांसह, नेते, प्रवक्ते आणि विविध पदाधिकाऱ्यांसाठी या कार्यालयात स्वतंत्र दालने असतील.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज